July 19th 2008
Va. Pu. Kale- Vapurza (From forum)
Va. Pu. Kale’s Vapurza novel is posted by PAjay on Marathi Online forums. Visit forum to read.
July 19th 2008
Va. Pu. Kale’s Vapurza novel is posted by PAjay on Marathi Online forums. Visit forum to read.
July 19th 2008
For all of you who are looking to intereact for other members, there is a forum available. Feel free to post your favorite article there. You can also write about कथा, कविता, विनोद, महाराष्ट्र- वगैरे वगैरे.
आणि हो- आता तुम्हाला तुमच्या comments एथे खालीच लिहिता येतात!!
November 2nd 2006
नुकताच साजरा झालेला फ्रेंडशिप डे गणूच्या आयुष्यात मॊठ्या अक्षरांत (किंवा फॉन्टमध्ये) लिहिला जाईल. याचे कारण म्हणजे, आयुष्यात प्रथमच त्याने आपल्या काही दोस्तांना पत्र लिहिले (ते अजून पोस्ट केले नाही…पण लिहिले हे काय कमीय!) आम्हाला त्याचा सुगावा लागला व आम्ही ते अक्षरधन मिळविले…….ते जशास तसे देत आहोत……..
प्रिय मक्या,
बालपणीचा काळ सुखाचा…असे म्हणतात. पण हे शब्द खोटे ठरविण्यासाठी ज्या ज्या मास्तरांनी माझा छळ केला, त्यांचा बदला घेण्याचे आद्यकर्तव्य पार पाडण्यास तू मला भाग पाडलेस. (म्हणूनच मी इथे(च) राहिलो). तर आज मी जो काही आहे (आणि नाही) त्याचे श्रेय तुला द्यावेच लागेल.
मला अजून आठवते. आपण सातवीत असताना, आपण शिकवणीसाठी जात असलेलो (हो..शाळेतलेच) माळी मास्तर. आपण रोज सकाळी त्यांच्या घरी शिकवणीसाठी जायचो आणि तू बाहेर लावलेली त्यांची सायकल गुपचूप पंक्चर करायचास. बिचारे सर, रोजचे पंक्चर काढून थकले, त्यांची तब्येत उतरली (आणि पंक्चरवाल्याची तब्येत सुधारली). एकदा मी नसताना, तू त्यांना म्हणालास..सर आज तुमची सायकल पंक्चर होणार नाही..कारण आज गण्या नाही…तुझ्या या वाक्याने माझे शालेय जीवनात वादळ आणले. माळी सरांनी मग माझी अशी काही कटाई केली की माझी शिक्षणबाग कधी फुललीच नाही. त्यांनी या गोष्टीचा बोभाट सर्वत्र केला आणि अकारण माझी इमेज बदलली. पोरं तर सोडाच, गुरुजी लोकसुद्धा गण्या..लेका सायकल लावू का …पंक्चर तर करणार नाहीस, असे म्हणू लागले.
दुसरी आठवण तर विसरणे, केवळ अशक्य. आपल्या शाळेत टिळक जयंतीनिमित्त विद्यार्थी वक्तांची नावे द्यावे, अशी नोटीस आली तेव्हा तू माझ्या परस्पर माझे नाव नोंदवले. ऐन कार्यक्रमात माझे नाव पुकारले गेलो..तेव्हा जो दरदरा फुटलेला घाम आहे, तो अजून थांबलेला नाही. त्या क्षणाने माझी शालेय सार्वजनिक जीवन उद्धवस्त केले. बळेच व्यासपीठावर आलो…लोकमान्य टिळकांविषयी मी बापुडा काय सांगणार…त्यांच्याविषयीचे माझ्या मनातल्या भावना मी शब्दांत व्यक्त करु शकणार नाही…असे म्हणालो…माझ्या डोळ्यातले पाणी पाहून मला खाली बसविण्यात आले. ही तुझीच करामत असल्याचे नंतर लक्षात आले….टिळक तुला कधीच माफ करणार नाहीत.
किती किती आठवणार… दापके सरांच्या घरी सर रस्त्यावर पडल्य़ाचा माझ्या नावाने तू केलेला फोन, गायकवाड सरांना गाता येत नाही असे मी म्हणाल्याचा त्यांना केलेला रिपोर्ट, जांभळे मॅडम कविता शिकविताना उड्या मारतात, असा मी प्रसार केल्याचा तू केलेला प्रचार इत्यादी इत्यादी…अशा प्रकारांमुळे काही कारण नसताना मी बहुतेक सर्व विषयांच्या शिक्षकवर्गाच्या कोपास पात्र जाहलो…अनेकदा परिक्षेत अपात्र जाहलो… गुरुजन व पालकजनांकडून माझा छळ सुरु झाला व त्यातून मला खरोखरच खोड्या करण्याचे बळ आले, हे गोष्ट निराळी.
अजून काय लिहिणार…फ्रेंडशिप डे दिवशी मला आता कुणी अचानक बोलायला लावले, तर मित्र नसावा तर असा…हे मी सदोहारण देत बोलू शकतो. आपल्या वेळी फ्रेंडशिप डे नव्हता…असता तर तू बकऱ्याला मारण्यापूर्वी त्याला सजवतात, तसे आमच्या हातात बॅंड लावून नंतर आमचा बॅंड वाजवला असता…(बॅंड न लावला तू परिणाम साधलास…तुसी बडे ग्रेट हो यार…) तू काय कुठे आहेस…काय करतोस माहिती नाही..तुला मी आठवणारही नाही…पण तुझी आठवण आल्याशिवाय आमच्या शाळेच्या आठवणीही सांगता येत नाहीत.